मुख्य सामग्रीवर वगळा
खुप आठवणी आहेत,
तुझ्यासोबत आठवण्यासाठी ,
अजून क्षण हवेत,
जन्मभर साठवण्यासाठी

पावलं मागं खेचताहेत,
पण मन पुढं धावतंय,
शब्द मनी साचताय,
पण मनी भलतंच येतंय,

झरा, ओहोळ, नदी, सागर,
सरलं सगळं क्षणात सरसर,
साठवायचं किती नि आठवायचं किती,
माझीच मला आता वाटते भीती ,

हेवा वाटतो पारिजातकाचा,
फुलतोय तो निरपेक्ष,
चरणी आला देवाजीच्या ,
भक्ती हेचि लक्ष ,

मलाही वाटे व्हावे प्राजक्त,
ओघाळावं  अलवार,
अन मन करावं जरासं सक्त,
विसरावं दिनवार .

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

व्यथा

सगळ्याच व्यथा मांडता येत नाही सगळ्याच कथा सांगता येत नाही मनाची गुपितं मनातच शोभतात मनातले आशीर्वाद मनातच लाभतात न बोलता मनातले सगळ्यांनाच काळत नाही सोबत राहूनही सगळेच सोबत राहत नाही पावसात उभं राहून कोरडं थोडी राहतं कोणी झऱ्याने  वाहिले तरी सागरालाच मिळतं पाणी