मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
खुप आठवणी आहेत, तुझ्यासोबत आठवण्यासाठी , अजून क्षण हवेत, जन्मभर साठवण्यासाठी पावलं मागं खेचताहेत, पण मन पुढं धावतंय, शब्द मनी साचताय, पण मनी भलतंच येतंय, झरा, ओहोळ, नदी, सागर, सरलं सगळं क्षणात सरसर, साठवायचं किती नि आठवायचं किती, माझीच मला आता वाटते भीती , हेवा वाटतो पारिजातकाचा, फुलतोय तो निरपेक्ष, चरणी आला देवाजीच्या , भक्ती हेचि लक्ष , मलाही वाटे व्हावे प्राजक्त, ओघाळावं  अलवार, अन मन करावं जरासं सक्त, विसरावं दिनवार .

व्यथा

सगळ्याच व्यथा मांडता येत नाही सगळ्याच कथा सांगता येत नाही मनाची गुपितं मनातच शोभतात मनातले आशीर्वाद मनातच लाभतात न बोलता मनातले सगळ्यांनाच काळत नाही सोबत राहूनही सगळेच सोबत राहत नाही पावसात उभं राहून कोरडं थोडी राहतं कोणी झऱ्याने  वाहिले तरी सागरालाच मिळतं पाणी

Life

कळत न कळ्त आयुष्य  घडत गेलं  घडत गेलं तसं बिघडतही गेलं बिघडलं सावरायाला शिकले सावरलेलं आवरायला शिकले आळवावरचं पाणी मोती झाले मोत्यांनी डोळे चिंब केले जुने क्षण पुढयात ठाकले हळव्या क्षणांसमोर मनही झुकले ☺☺